प्रेमरंग
प्रेमरंग
प्रेमाचा तो रंग लाल
लाल गुलाब घेवून गेलो l
ती नाजूक आहे सुकुमार,
तिला हळूच तो देवून आलो l l१ ll
तिने केसात माळला तो,
विद्यालयात हळूच आली l
गुलाबाला हात लावुनी ती,
हळूच माझ्याकडे पाहू लागली ll२ ll
मन हर्षाने माझे नाचू लागले,
पाहून तो एक प्रेमरंग l
तिला बघत राहिलो सारखा
स्वप्नातच झालो मी दंग l l ३ ll
हळूच मित्राने मला हलविले,
भावा गेला हरवून तू कोठे l
स्वप्न मनीचे सांगू कसे त्याला
प्रेमरंग हे स्वप्नच ठरले खोटे ll ४ ll