STORYMIRROR

Balkrishna Gharat

Others

4  

Balkrishna Gharat

Others

प्रेममिलन

प्रेममिलन

1 min
287

सागराला पहाडी लाटांची 

भरती ओहोटी ही येतच असते

भरतीसमयी तो जणू सांगतो असतो

किनाऱ्या त्या प्रिय

की...

आपले हे प्रेममिलन

क्षणभंगुर असणार आहे

कारण...

होताच ओहोटी मी

दूर दूर जाणार आहे

तसं आपुलं मिलनाचं सत्र

चालणारच आहे 

पहा प्रत्येक दिवसरात्र

होईल आपली भेट पुन्हापुन्हा भेट

कमी अधिक अंतरावरून

तर....

ती कधी अगदी जवळून

पण...

होणार आहे ती नक्की 

एकदम पक्की!

खरंच....

एकदम पक्की!!


Rate this content
Log in