STORYMIRROR

Yash Ingale

Romance

3  

Yash Ingale

Romance

प्रेमाचा पाऊस

प्रेमाचा पाऊस

1 min
140

तो सुंदर प्रेमाचा पाऊस

प्रिये, आजही आठवतो ग मला..

तो बेधुंद बरसणारा,प्रेमगीत गाणारा

सुंदर पाऊस सांग आठवतो का ग तुला ?


त्याच पावसात भेटलो होतो ना ग,

प्रिये आपण आयुष्यात कधीकाळी 

तू बोलकार असल्यासंम बोलत होती

अन्, मी निःशब्दच होतो त्या सकाळी...


केले होते ग प्रेमाचे मी वर्णन 

अबोल माझ्या सुंदर कवीतेतूनी

त्या अव्यक्त भावना तुला नाही कळल्या

कारण प्रकटल्या नव्हत्या माझ्या ओठातूनी..


अपुल्या भेटीने पाऊस आनंदून गेला होता

निसर्गही जणू आपल्याला साद घालीत होता

मी माझा मनातील भाव कवितेत मांडला

पण दुर्दैव, तो तुला कधी कळलाच नव्हता...


त्या दिवसांनंतर तू पुन्हा कधीच न आली..

तुझ्या आठवणीत जीव माझा कासावीस होता

मी रडत होतो ग प्रिये, आजसुद्धा तुझ्यासाठी

पण, तो वेडा पाऊस कुणासाठी मग रडत होता?


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance