STORYMIRROR

Yogita Chincholikar

Romance

3  

Yogita Chincholikar

Romance

प्रेम हे तुझे नि माझे

प्रेम हे तुझे नि माझे

1 min
465

नव्या नव्या नात्याला नवी नवी चाहूल 

मनात माझ्या का हुरहूर काहूर 

जगण्यातले गूढ हे कधी नाही कळले 

जीवनाचे सूर हे विरहाने जुळले 

प्रेम हे तुझे नि माझे .....।।१।।


तुझ्या या हसण्डयाने तुझ्या या रडण्याने

माझ्या मनी होतो वेगळा आभास 

निःशब्द प्रेम हे कधी नाही कळले 

प्रितिचे प्रेम हे नव्याने फुलले

प्रेम हे तुझे नि माझे.....।।२।।


तुझ्या माझ्या नात्याला भावनेचा स्पर्श 

ओढ हि आपली अन् पावसाचा हर्ष 

गुंफली दोर हि कधी नाही कळले 

वागणे हे वेगळे हवेहवे वाटले 

प्रेम हे तुझे नि माझे.....।। ३।।


 विश्वास आपुला हा जन्माजन्माचा

हातात हात हा अबोल वाणीचा

मिठीत राहणे कधी नाही कळले 

बेभान प्रेम हे मनातून फुलले

प्रेम हे तुझे नि माझे......।।४।।


Rate this content
Log in

Similar marathi poem from Romance