प्रभाव
प्रभाव

1 min

176
शशीचा प्रभाव
प्रभावर पडे
उषाचे पारडे
खालीवर ।।१।।
प्रभाची ग माया
शशीचा रे धावा
आतातरी यावा
योगायोग ।।२।।
उषाचा रे शशी
प्रभावर भाळे
अंतरीचे चाळे
रंगतात ।।३।।
उषाच्या मनात
पराचा कावळा
तरी कळवळा
प्रभासाठी ।।४।।
साक्षीचा अभाव
सुरेखाच्या वाटे
खोलवर काटे
रुततात ।।५।।