Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!
Unlock solutions to your love life challenges, from choosing the right partner to navigating deception and loneliness, with the book "Lust Love & Liberation ". Click here to get your copy!

Rohini Khot

Others

4  

Rohini Khot

Others

प्राधान्य नोकरीला का घराला?

प्राधान्य नोकरीला का घराला?

1 min
317


कोंबड्यानं बांग देण्याआधीच

सखे तुझ्या दिवसाची सुरुवात होते

तुला अलार्मक्लॉक ची नाही तर

अलार्मक्लॉकलाच तुझ्या वेळेची सवय होऊन जाते


पहाटप्रहरी सडारांगोळी-देवपूजा झाल्यावर

घरच्यांची तुझ्या सकाळ उगवते

अंथरुणात बसूनच कोणी मग 

नाश्त्यासाठी ऑर्डरी सोडते


त्यांना अंघोळीच्या पाण्यापासून चहाच्या

 कपापर्यंत सगळं तुझ्या हातून लागते

त्यातून आणि पोह्यात आज मीठच

कमी पडलं असं मधूनच कोणी म्हणते


घड्याळाचे काटे भरभर फिरतात

तशी तुझी कामाची धांदल उडते

घरचे उरकून होईपर्यंत

तुझ्या ऑफिसची वेळ होऊन ठेपते


मग तशीच धावतपळत बस बदलत

ऑफिसात तू लगबगीने पोहोचते

प्रोजेक्टची काम करता-करता

लंच ब्रेकची वेळही संपते


तूच केलेला डबा खायला 

तुला वेळ मिळत नसते

त्यातुन मध्येच काही खावं म्हटलं तर समोर

बॉस नावाची टांगती तलवार दिसते


थकून-भागून पुन्हा तुझी गाडी 

घराच्या उंबरठ्यात येऊन थबकते

टेकून बसावं निवांत दोन क्षण म्हटलं

की तेवढ्यात कोणी दारात येऊन टपकते


सण समारंभात सगळ्यांसोबत राहताना

घरच्यांना भारी मौज वाटते

पण सगळ्यांची मर्जी सांभाळताना

तुझी बिचारीची मात्र कंबर जाते


घर आणि नोकरी 

ही शेवटी तुझीच चॉईस असते

त्यामुळे तुला होणाऱ्या त्रासाची

इथे कोणालाच पर्वा नसते


गृहलक्ष्मीनं घरची काम करावीत

ही घरच्यांची इच्छा असते

आणि वेळेवर काम व्हावं 

ही ऑफिसची डिमांड पडते


हे सगळं करताना सखे

तुझी मात्र हेळसांड होते

इतरांच्या मूड आणि वेळेनुसार तुझं आयुष्य

सेट करताना तुझ्या आनंदी मनाची मात्र सेटिंग बिघडते


तुझी स्वप्नं-तुझी स्पेस

संसाराच्या रहाटगाडग्यात मागे पडून जाते

तशात स्पर्धेच्या या युगात

भावनांना आवर घालून तुला नेहमी अपडेट रहावे लागते


नोकरी की घर हे निवडताना

तुझ्या मनाची कोंडी होऊन जाते

म्हणून मग आनंदाने दोन्ही निभावनं

यातच तू तुझं सुख मानते


सखे तुझं आयुष्य म्हणजे अक्षरशः 

तारेवरची कसरत असते

तुझ्या वंशाला जन्मल्यावरच लोकांना 

त्याची खरी किंमत कळते



Rate this content
Log in