फळे
फळे
1 min
338
मधुर गोड
असतील फळे
फुलतील मळे
अवीट फोड
आंबा हापूस
बने आमरस
सुमधूर रस
तान्ह्यास जूस
फळ कोकणी
फणस काटेरी
कोकणात फेरी
शोभे अंगणी
जीवनसत्त्व
पपईत असे
गुणधर्म वसे
औषधी तत्त्व
आंबट गोड
तुरट आवळा
स्त्रीवर्गास लळा
नसेच तोड
सफरचंद
आकार तो गोल
आरोग्याचे मोल
बालका छंद
