STORYMIRROR

Neel Soundekar

Others

4  

Neel Soundekar

Others

पहिलं प्रेम हे पहिलं असतं

पहिलं प्रेम हे पहिलं असतं

1 min
5.6K


पहिलं प्रेम हे पहिलं असतं

कोणत्याही उदाहरणाशी त्याचं साधर्म्य नसतं


प्रत्येकाच्या हदयात ते फुलत असतं

मनाच्या कोपर्‍यात घर करुन बसतं

मागे वळून पाहता मैलाच्या दगडाप्रमाने दिसतं

पहिलं प्रेम हे पहिलं असतं


प्रत्येकाच्या मनात भावनेचं पर्वत बनून उरतं

मनाच्या गाभार्‍यात नेहमी चिरतरुण राहतं

दिवा विजला तरी प्रकाशाची जाणीव देतं

पहिलं प्रेम हे पहिलं असतं


प्रत्येकाच्या मनात सल करुन राहतं

नदिच्या प्रवाहात मधोमध खडक बनुन वसतं किनार्‍यावरही वाळूंचे थर लावून ठेवतं

पहिलं प्रेम हे पहिलं असतं


प्रत्येकाच्या आठवणीत आठवण होवून आठवतं

मनाला कधीतरी नवचैतन्य देवून जातं

सर्वांनाच सांगायला कुठेतरी घाबरतं

पहिलं प्रेम हे पहिलं असतं


Rate this content
Log in