"पहिला पाऊस"
"पहिला पाऊस"
1 min
329
पाऊस पहिला नवखा
वेडा होऊनी बेभान वारा,
थंड,थंड शीतल धारा.
तहानलेली आवसून
भुक्याट जमीन,
गडगडाट,होऊनी नभांगनी.
विजांचा ही चमचमाट
झाडं करतो भुईसपाट.
मृगाचा पाऊस, पेरणी भारी
पेरलेले धान, कणग्या भरी.
जाड थेंबाच्या सरीवर सरी
जणू, शेष नाग फुसफूस करी.
कोरी ठणठणीत नदी
फेस धरी,होई जलपरी,
जीभ तिची चाटत फिरी.
चाटता चाटता, सुसुवाट धाई
अलिंगन जणू दर्यास देई.
