STORYMIRROR

Kanchan Gade

Others

4  

Kanchan Gade

Others

फेबुरवरीचे vs गरीबीतले दिवस

फेबुरवरीचे vs गरीबीतले दिवस

1 min
177

सगळ्यांना फेबुरवरीचे दिवस माहित आहे अन् मला गरीबीतले दिवस माहित आहेत....

तुम्हाला डायनिंग टेबलवर बसून जेवायचे माहित आहे अन् मला हातावर भाकरी घेऊन जेवायचं माहीत आहे...

थंडीत अंगावर शाल घेऊन झोपायचं तुम्हाला माहीत आहे अन् मला रात्री जागून शेतात पाणी भरायचं माहित आहे...

सगळ्यांना फेबुरवरीचे दिवस माहित आहे अन् मला गरीबीतले दिवस माहित आहेत....

एक एक पैसा न विचार करता कसं उधळायचं हे जरी तुम्हाला माहीत असलं...

तर तोच एक एक पैसा कसा जपायचा हे मला माहीत आहे....

लेकराने हट्ट केल्यावर त्याचा तुम्ही हट्ट पुरवत असाल....

पण मला लेकराला गरिबी समजून सांगणं माहीत आहे...

सगळ्यांना फेबुरवरीचे दिवस माहित आहे अन् मला गरीबीतले दिवस माहित आहेत....

दिवस रात्र तुम्ही ही काम करता अन् मी ही काम करतो.....

पण मला त्या एक एक घामाच्या थेंबाची किंमत माहीत आहे...

AC मध्ये बसून पगार घेण्याचं तुम्हाला माहीत आहे

अन् मला एवढं राब राब राबून मालाला हमी भाव कमी घेणं माहित आहे....

सगळ्यांना फेबुरवरीचे दिवस माहित आहे अन् मला गरीबीतले दिवस माहित आहेत....

Rate this content
Log in