STORYMIRROR

Kanchan Gade

Others

2  

Kanchan Gade

Others

चंद्राची टिकली

चंद्राची टिकली

1 min
220

आज निसर्गाने चंद्राची टिकली लावलीय आणि डोक्यावर चांदण्यांचा मुखवटा घातलाय ....त्या आकाशामध्ये.....


सुंदर अशी साडी नेसलिय ....सूर्याच्या किरणांच्या थोडयाशा प्रकाशामध्ये ..

लालसर...निळसर .. तांबडसर....अश्या प्रकारची...


आज हा निसर्ग खूप खुलून गेलाय...

सर्व चांदण्या ही आज घरा बाहेर आल्या आहेत....


अमवशा कालच झाली ...

पौर्णिमेची वाट बघत आहे...


चिमण्या ही झोपल्या.. कावळे ही झोपले....

सर्व पक्षी आपापल्या घरट्यात परतले ...


पवन सुध्धा आनंदाने वाहतोय...

कारण आज निसर्गाने चंद्राची टिकली लावलीय आणि चांदण्यांचा मुखवटा घातलाय ....


‌पृथ्वी हिरवी साडी घालून नटली आहे...कानात तिने डुल घातले आहे...आणि अंगावर शाल पांघरलीय.....

मेघांची वाट बघतिय...


मेघ ही आता जवळ आलाच आहे......कारण मिरुग आत्तच निघाला आहे ....


कोरोना ने थैमान घातले...त्याला लोकं ही त्रस्तून गेलीय...

कोरोणा ला संपवण्यासाठी प्रत्येक जीव प्रयत्न करतोय...


आज घरातच बसून कांचन ही हे सर्व लिहतीय

कारण की आज निसर्गाने चंद्राची टिकली लावलीय आणि चांदण्यांचा मुखवटा घातलाय


Rate this content
Log in