पहाट
पहाट
1 min
169
सौम्य सोनिरी उन्हात
मनात तरंग उठले..
धरणीच्या क्षितिजाभवती
मन बेभान सुटले..
सृजनाच्या पाणवठ्यावर
एक पक्षी नवीन आला..
विस्कळलेल्या डोंगरातून 'अनवाणी'
उंच गगणी स्वार झाला..
व्याकुळलेली मंद पहाट
धरणीच्या उंबरठ्यावर आली..
दव सजवून फुलांवरती
ओलसर मनात रुतून गेली..
