पावसा तुला हे कस जमल
पावसा तुला हे कस जमल
1 min
288
वैशाख महिन्यात येणं तुला जमल
कोकिळेचा गाण्याशी नातं तु जोडल
काय रे पावसा तुला हे कस जमल…
थेंब पडताच मोराला नाचवायला तुला जमल
मातीला तर केव्हाच आपलस केल
काय रे पावसा तुला हे कस जमल….
तुझी वेळ तर ठरलेली असती
स्वागताला सर्वच तयार राहतील
काय रे पावसा तुला हे कस जमल….
कधी मनाप्रमाणे कोसळून घेतल
कधी हट्टाला पेटून तु उठल
काय रे पावसा तुला हे कस जमल…..
कधी वाट बघण्यात वर्ष गेल
नदी नाल्याना ओसाड केल
काय रे पावसा तुला हे कस जमल…..
हिरवळीला सांगिंतले तु येऊन गेल
ओढ्याना तु मनसोक्त भरून गेल
काय रे पावसा तुला हे कस जमल...
बळीराजाशी तुझं नातं तु घट्ट बांधल
तुझा बिगर जगन तु मुश्किल केल
काय रे पावसा तुला हे कस जमल……
