पाऊस
पाऊस




कृष्णभारल्या नभांनी,
निळाई व्यापून गेली
तुझ्या आठवांनी,
अश्रूंची बरसात झाली
मधुर पदस्पर्शाने धरा,
पलपल गंधाळली
प्रितीची एक निशाणी,
समिरकलाने दरवळली
मम भाग्यात एक शलाका,
अखंड होती तमभरली
तंव प्रितीची वीज कडाडता,
वाट माझी प्रकाशली
मंद मंद गारव्यासवें,
सृष्टी अवघी शहारली
मनोमनीच्या मारव्याने,
प्रीत अपुली बहारली...