कशाला?
कशाला?
1 min
24
ध्यानस्थ यतिला धनघागर कशाला?
बेडकास डबक्यातल्या सागर कशाला?
मार एकदा प्रेमाने, हाक सखे प्रियाला
न्याहाळण्या चंद्राला पौर्णिमा कशाला?
जातो बरसून "तो" हवा तेव्हा, हवा तसा
येण्यास चातकाचे आमंत्रण कशाला?
चिंता सोडच तू, तुटलेल्या हृदयाची
नापीक भूमीची मशागत कशाला?
मनसोक्त झोकून दे...आज तू स्वतःला
मनसागरी बुडण्याची भीती कशाला?
आहे असाच मी, जगतो तसाच आहे
नाहीच आहे ते, दाखवणे कशाला?