पाऊस
पाऊस
1 min
41.6K
सर सर धरतीवर अाल्या पावसाच्या सरी
मेघराजाची झाली किमया ही खरी
धरतीमाता नेसुन अाली हिरवा शालू
खळखळणारे पाणी हळूहळू लागले चालू ..
विवीध रंगांच्या अनेक फुलांचा गंध पसरला चाेहीकडे
सुंदर सुगंधीत गंध सुशाेभीत दरवळला सगळीकडे ..
पंख पसरून पक्षी उडू लागले निळ्या निळ्या अाकाशी
किरकिरणारे चमचमते काजवे हितगुज करू लागले काळाेख्या निशाशी ..
वाटते घरात कैद करून ठेवावे पावसाला
पण खरेच का ताे बंदीस्त राहीन का माझेच घर नेऊन मिळवेल सागराला .
