पाऊस.
पाऊस.
1 min
198
धुंद बरसणाऱ्या पावसात,
आठवावे वाटतात, जुने क्षण.
कोसळणाऱ्या धारा ही मग,
हलके करतात थकलेले मन.
आठवणींच्या पावसात,
मन चिंब - चिंब भिजत होते.
सोबतीला होत्या जलधारा ,
दुःख मात्र माझे , जाणत होते.
काळोख्या नभात पाहताना,
वारा देहास स्पर्शून जातो.
तुझी आठवण काढली की,
शब्द मात्र ह्रदयावर कोरून जातो.
