पाऊस माझ्या मनातला
पाऊस माझ्या मनातला


तेज सूर्याचे पसरलेले चहुकडे
उकाडा अन प्रकाश होते जिकडेतिकडे
तेवढ्यात सुटला एकाएकी गार वारा
पावसाच्या सरीसाठी उत्साही झाली उष्ण धरा
निरभ्र निळ्या त्या आकाशाच्या कुशीत
कृष्णमेघ जमले अनेक अवचित
आगमनाने त्यांच्या काळोख दाटला जनू
मग दृश्य हे पाहून प्रेमभावात नटला मनू
झेलला मी गालावरती पर्जन्याचा पहिला थेंब
शेवटी पावसाने ही लावली हजेरी विनाविलंब
रिमझिम रिमझिम सरींचा होत होता वर्षाव
मनावर माझ्या या सगळ्याचा होऊ लागला प्रभाव
विचलित झाले मन माझे त्या वार्याच्या समान
वाहू लागल्या अश्रुधारा कोसळत्या कृष्णमेघांसमान
पहिल्या पावसाच्या वर्षावात मी ओली चिंब भिजले
आठवणींच्या पसार्यात मग मी भान हरपून बसले
गेले काळे मेघ सारे जाहले पुन्हा निरभ्र ते आकाश
सूर्याच्या तेजाने पुन्हा पसरला चहुकडे प्रकाश
होता पाऊस तो माझ्यासाठी आठवणी घेऊन आला
अलगद मनाच्या जखमा ओल्या करुन गेला