STORYMIRROR

Minakshi Shinde

Others

3  

Minakshi Shinde

Others

पाउस

पाउस

1 min
174

पावसाचा सरा येती झरा झरा

झांकलेले नभ वाहे सोसाट्याचा वारा 

रसत्ययाने ओहोळ जाती खळखळ

जागोजागी खाचांमधे तूडुंबलेे जळ

झळकते सतेज ढगांंवर वीज

नर्तकीच आली गमे लेवूनिया साज

झोंबले अंगावर वारे , काया थरथरे

घरट्यात घुसूनिया बसली पाखरे

हर्षलासे फार , नाचे वनी मोर

पानातून हळू पाहे डोकावूून खार

झाडाचिया तळी , डोईवरी मारा 

रानातली गूूूरे शोधिती निवारा 

धरणी हसली , सूस्नात जाहल  

वरूनाच्या वर्षावानेे मने संतोषली


Rate this content
Log in

More marathi poem from Minakshi Shinde