पांडुरंगा
पांडुरंगा

1 min

228
पांडुरंगा, तू दगडाचा आहेस
हे मी सिद्ध करून दाखवतो
तू तुझं देवपण सिद्ध कर...
नसेलच जमत तर होऊ दे
खडाजंगी तुझ्या माझ्यात
या नास्तिकासोबत युद्ध कर...
माझे विचार स्वच्छच आहेत
पायरी सोडून ये ऐकायला
नी तुझा आत्मा शुद्ध कर...
अस्तित्व धोक्यात तुझे रे
नराधम माजून सैतान झाले
जमलंच तर एखाद्याला बुद्ध कर...
रुक्मिणी पाठमोरी कशाला?
गुन्हा तुझा विचार जा एकदा
किमान तिला तरी वचनबद्ध कर...
आज आवाज माझा उठला
तुझ्या अस्तित्वावर धोंड्या
आता तरी स्वतःला सिद्ध कर...