ओढ पावसाची
ओढ पावसाची
1 min
62
उन्हाची झळ लागता
धरणीस दुभंगती तडे
ओलाव्यास व्याकुळ होऊनी
वाट पाहती उंच कडे••••१
श्रम न करताही आज
घामाच्या ओझरती धारा
निष्पर्ण सुकले उभे तरू
न वाहे झुळूक न मंद वारा••••२
टिपण्या दाणा गेली चिऊ
आली रिक्तहस्ते माघारी
भूक न साहे इवली पिल्ले
मातेला चिवचिवून चोच मारी•••३
घर असे मर्कटाचे तरुवर
पानगळतीने बेघर झाला
कुणी न देई त्यास आसरा
जो तो स्वसंसारी गुंतला••••४
झाडे, पशु, पक्षी, मानवा
लागे ओढ पावसाची
उशीर नको घे धाव झडकरी
बघ दीन दशा अवनीची••••५