ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

86
ओढ तुझी
मातीच्या कणाकणाला
सुकलेली नदी अन
अन्नदात्याच्यामनाला |
तुझ्या सरी येता भुईवर
तृण तृण उजळते
थेंबा थेंबाची धुन
कवी मनी गाणे गाते |
तुझ्या पहिल्या सरीने
वाही अत्तराचा वारा
पक्षी होई बेभान
नृत्य करी मयूर फुलवीत पिसारा |
तुझा स्पर्श होता
सृष्टी हिरवळीने न्हाई
नदी माय माझी
लेकरा सुखवीत जाई |
तुझ्या अमृताची गोडी
सजीवांचे जीवन
साथीने तुझ्या बळीराजा
फुलवितो रान |
तुझ्या मायेचा झरा
दऱ्याखोऱ्यातून वाही
इंद्रधनू करी रंगांची उधळण
सृष्टीचा स्वर्ग होई |