ओढ पावसाची
ओढ पावसाची


*पाहे चातक वाट ही पावसाची*
*मनाही ओढ लागे ही जणू तयाची...*
*कोसळतील धारा कधी अवनीवरती*
*दा टून येती भावना अलवार किती...*
*तृप्त होई मन पाहून या नभी*
*मेघ जमती आकाशी घेऊन जलधी...*
*ओढ जिवाला लागे ही कैसी*
*सखा भेटीची आस लागे जीवाला ऐसी...*
*धुंद करी मनाला हा गारवा*
*भिरभिरे जसा वाऱ्यावर हा पारवा..*
*हुरहूर लागे कधी बरसेल या सरी*
*जीवाची काहिली होता मेघ दाटती अंबरी....*
*थेंब टपोरी झेलती ही अवनी*
*नयनरम्य दृश्य पाहुनी नयन जाते मोहूनी...*
*लागे ओढ पावसाची बळी राजास ही*
*नजर त्याची रोखून पाहते नभासही....*
*सृष्टी ही भेटाया आतुर झाली जलासही*
*कधी बरसेल जलबिंदू बनुनी मोती ही....*
*चराचरात आनंद बहरेल पर्जन्याच्या आगमनानी*
*गगनात मावे ना आनंद हा*ऋतूच्या स्पर्शानी....*
*हर्ष आला जीवनी बहरता ही*अवनी*
*ओढ पावसाची लागता सुखावते ही धरणी....*