ओढ पावसाची
ओढ पावसाची

1 min

30
सर येता पहिल्या पावसाची
हर्ष सारा आसमंत झाला..
सर येता भुईवर या
सुगंध सुटला मातीला..
सर येता पहिल्या पावसाची
मेघ हे सारे गरजू लागले..
सर येता अचानक ही
सजीव सारे, सैरभैर पळू लागले..
सर येता पहिल्या पावसाची
झाडे-झुडुपे डोलू लागली..
सरीवर सर येता ही
हिरवीगार धरती होऊ लागली..
सर येता पहिल्या पावसाची
अंग सारे शहारून आले..
घेता कुशीत पहिल्या सरीला
मन हे ओलेचिंब भिजून गेले..
सर येता पहिल्या पावसाची
दुष्काळ एकदाचा संपून जातो..
घेऊन सोबत बैल-जोडी
शेतकरी राजा शेत नांगरू लागतो..
सर येता पहिल्या पावसाची
मन आनंदी होऊन जाई..
येऊन जाता सर पहिली
पुढच्या सरीची डोळे आता, वाट पाही..