ओढ पावसाची
ओढ पावसाची
*_माझा शेतकरी तसा जगाचा पोशिंदा_*
*_खूप स्वप्नं बाळगली बालचिमुकल्यांची_*
*_सारे जीवन त्याचे काबाडकष्टाचे_*
*_आतुरता लागली त्याला मृगनक्षत्राची...!!१!!_*
*_तहानली सारी जीवसृष्टी_*
*_वाट पाहुनी मृगजळाची_*
*_कधी कधी जाई कोरडं नक्षत्र_*
*_न आटेल ती कोरड घशाची...!!२!!_*
*_कासावीस होई जीव उन्हाच्या झळांनी_*
*_सारी जनता पाण्यासाठी आसुसली_*
*_धरणीही आसुसली मृगधारेसाठी_*
*_चाहुल त्या मृग नक्षत्राची लागली...!!३!!_*
*_दाटुनी आले मेघ आभाळी_*
*_ओसंडती जलधारा नभातुनी भुमीवर_*
*_खळखळ वाहे पाण्याचे लाट_*
*_आनंद पसरला सऱ्या भूमीवर...!!४!!_*
*_आतुरता लागली त्या मेघराजाची_*
*_उन्हाळा सर
ला मेघराजा अवतरला_*
*_मुबलक जल धरणीला मिळाले_*
*_पावसाच्या आगमनाने बळीराजा सुखावला...!!५!!_*
*_कोसळू लागतात मृगाच्या सरी_*
*_न्हाऊनी निघाली सारी पाऊसधारेनं_*
*_जीवसृष्टीला आनंद येई भारी_*
*_जो तो आपली रंगवी स्वप्नं...!!६!!_*
*_बळीराजा सुखावला,जीवसृष्टी आनंदली_*
*_मृगाच्या सरी बीज अंकुरे मातीतूनी_*
*_नाही उरला पारावार बळीराजाच्या आनंदाला_*
*_फळ मिळालं त्याच्या प्रामाणिकतेतुनी...!!७!!_*
*_शेतकरी राजाचं सारच जीवन_*
*_अवलंबून असतं पाऊसराजाच्या आगमनावर_*
*_मेघ दाटुनी-पाऊसधारा ओथंबतात_*
*_न्हाऊनी निघते ही धरणीमाता पुरेपुर...!!८!!_*