नवीन वर्षाचे स्वागत
नवीन वर्षाचे स्वागत
1 min
159
संपले बारा महिने आता आले नवीन वर्ष ,
स्वागत करूया त्याचे होऊनी सारे हर्ष,
स्वप्न पाहतोच रोज सारे आता धरू त्याचा ध्यास ,
पाहिलेली स्वप्ने सत्यात उतरवू हीच आता आस,
धावपळीच्या या जीवनात देऊ एकमेकांना साथ,
जिद्दीने करूया या कोरोना संकटावर मात,
तिरस्कार, अहंकार सारा मी पणा सोडुया,
जग सारे सुंदरच आहे नाती विश्वासाने जोडुया,
यशाच्या मागे धावूच आपण पण साथ गरजूंना देऊ,
त्यांचे आपुलकीचे शब्द आणि आशिर्वाद नक्कीच घेऊ,
सण सारे येणारच आहेत आनंदाने साजरे करूया,
झालेल्या चुकांचा विचार न करता मागे त्यांना सारुया,
आई -बाबा आहेत सोबत म्हणून चालूया त्यांच्या संस्कारांवर,
आनंदाच्या सरी बरसु द्या या नवीन वर्षावर.
