बाबा
बाबा




सर्वजण करतात आईवर कविता ,
बाबाला तुम्ही विसरलात का आता?
हात धरून चालायला शिकविते आई,
तर ,दुडूदुडू धावायला शिकवितो बाप,
यश मिळाल्यावर बापाची मायेची थाप.
आईवर निबंध लिहिताना पाने कमी पडतात,
पण बाबावर निबंध लिहिताना चारच शब्द सुचतात.
बाप उन्हात राबून देतो सुखाचा घास,
मुले आनंदी राहावी हाच त्याचा ध्यास.
स्वतः वापरतो चप्पल तुटलेली ,
आपल्या लेकरांची काळजी.
डोळयात त्याच्या मिटलेली
बाबाच्या ओरडण्याचे असते
साऱ्यांना भय
प्रत्येक संकटात येते त्याची वेळोवेळी सय
बाबांच्या खांद्यावर मिळते दर्शन साऱ्या जगाचे
नेहमीच आपल्याला लाभते पाठबळ त्याच्या विचारांचे
आई श्रेष्ठ का बाबा श्रेष्ठ हा प्रश्न तरी का करावा
या जगातील हा प्रश्न कायमचा संपावा