नुस्ता मिरच्याचा ठेचा
नुस्ता मिरच्याचा ठेचा
1 min
41.6K
नुस्ता मिरच्याचा ठेचा आम्ही भाकरीसंग खातो
यांच्या नशिबात बिर्याणी आम्ही भातासाठी मरतो
वावरात आमच्या कुठे सुखाची आरास असते?
तरीपण आम्ही साले , यांना मासिक पगार असतो
आमची बायको एक साडी फाटते तरीपण घालते
यांच्या बायकोचा वेळ कपडे बदलण्यात जातो
एक वेळ उपाशी राहून आम्ही वावरामंदी राबतो
हा ऑफीसमध्ये कुत्रा पैसे गोळा करीत असतो
जरा वावरात येऊन पहा मातीचा आस्वाद घेवा
अधिवेशनात कुठे साल्या तू तुही डाळ शिजवतो
आलाच जरी आम्हाला तर किरकोळ ताप येतो
यांच्या नशिबात मग कसा मूळव्याध ,डायबिटीज असतो ?
सरकार सालं बुवांरं आमच्यासाठीच झोपते
जाहिराती कोटींच्या कर्जमाफी तिनश्यानी करतो
एल्गार आम्ही जर केला भाव अस्मानाला भिडले
शेतकऱ्याचं खाऊन साल्या त्यांच्या छातीवर बसतो
