निष्पाप कळी
निष्पाप कळी
1 min
26.4K
का भावनाशुन्य झालीयं
आता माणूसकी पुन्हा
निष्पाप कळी कुस्करल्या जातेयं
रोजच पुन्हा पुन्हा
निर्ढावलेली माणसं अन्
मेलेली माणूसकीचा अंत
प्रत्यय येतोय रोजचं
का होतोय करूण अंत
निष्पाप कळ्यांचा नाहक
रोजच बळी जातेयं
कुठे निर्भया तर कुठे आसिफा
रोजच कुस्करली जातेयं
मेल्यावर श्रध्दांजली वाहण्या
रस्त्यावर मेणबत्त्या पेटवतील
अरे पेटवा त्या नराधमांना आधी
असे निर्भया, आसिफांचे पुन्हा किती बळी जातील
