STORYMIRROR

Sarita Kaldhone

Others

3  

Sarita Kaldhone

Others

निसर्ग

निसर्ग

1 min
322

कळा वैशाख उन्हाच्या

माती पायाला पोळते

पडे थेंबमोती रानी

बीज सुखे अंकुरते...


ऊन, वारा, थंडी ,पाणी

सारी निसर्गाची रूपं,

नदी, सागरा पाहून

चढे अंगात हुरूप....


पाती हिरवी आनंदे 

कशी सुखाने डोलती,

पशू ,पक्षी नाचे सारी

होती जीवांचे सांगाती.....


प्राची खुलते प्रभाती

येता भास्कराची स्वारी,

गर्द निशेतून फुले

एक नवीन उभारी....

 

 वाटी सत्कर्माचे दान

राग ,लोभ, द्वेष नाही,

 सखा निसर्गासारखा

 नाही दुजा कोणताही... 


दिला निसर्गाने मुक्त

 भव्य विचार वारसा, 

 ठेवा देई दातृत्वाचा

नित्य जपावा तो ठसा


साहित्याला गुण द्या
लॉग इन