निसर्ग
निसर्ग

1 min

93
घन आच्छादले नभी
धरी ओथंबल्या धारा
घाट माथा चिंब झाला
भरून नदी किनारा ||१||
झाडे वेली पक्षी धुंद
झुळ झुळ वाहे वारा
गंध सुटता मातीला
मोर फुलवी पिसारा ||२||
पर्वत डोंगर द-या
शालू ओढून हिरवा
झाडा आडून कोकीळ
वाजवी मधुर पावा ||३||
ओढा नदी ही सागरा
गाव जाते ओलांडून
मजल दर मजल
गावोगावी आलिंगन ||४||
राणातून वाट जाते
चढून डोंगर घाट
दुर दुर मखमली
काय असे बघा थाट ||५||
पर्ण फुलांचा झुंबर
लोंबतो हा तरुवरी
निसर्गाची ती किमया
अजब ही चित्रकारी ||६||