निर्भया
निर्भया
थोडी सुखावलीय निर्भया
बघुनी अंत त्या नराधमांचा
न्यायासाठी 7 वर्षे ती तडफडली
न्यायदेवतेने आज डोळे उघडली
सापडली होती चुकून ती नराधमांच्या कचाट्यात
अग्निपरीक्षा होत होती तिची भर कोर्ट-कचेऱ्यात
केव्हाच संपली होती निर्भया शरीराने
जिवंत होती ती प्रत्येकाच्या मनामध्ये
आज फाईल ही तिची बंद झाली
कारण तिच्या आरोपींना फाशी झाली
इथे एका धड्याचा अंत झाला
पण पुढे अजून पुस्तक संपवायचं बाकी आहे
ते तर फासावर लटकले
पण तशीच नजर भर रस्त्यावर भिरकतेय
उद्या पुन्हा कोणीतरी निर्भया होईल
आणि पुन्हा उघडला जाईल नवीन धडा
आज आईबापाच्या संयमाला यश आलं
उद्या मिळेल का? उत्तर न्यायदेवतेला ही नाही देता आलं
रस्त्यात फेकल्यावर एक एक क्षण मृत्यूची तिने वाट बघितली
न्यायासाठी 7 वर्ष तिची अतृप्त आत्मा भटकली
फाशीची ठरलेली तारीख प्रत्येक वेळेस बदलली
का कोण जाणे त्या बसची वेळ कशी नाही चुकली
न्याय मिळूनदेखील थरकापली निर्भया
जेव्हा लक्षात आलं तिच्या...
अंत केवळ माणसाचा होतो विचारसरणीचा नाही !
