आई...
आई...
आई तुझ्या रुपावानी,
मोहक रूप या जगी नाही,
जरी फिरुनी आले मी दिशा दाही...
हास्य तुझे जणू उमलते फुल,
बघताच तुला पडे मला भूल....
कधीमधी रागात सूर्याची आग तू,
अंधाराला ही दूर करणारी प्रकाशाची वात तू...
असता डोळ्यात संतापाची लाही जरी,
दिसते कळकळ आमच्या भविष्याची तरी...
तुझ्यामुळेच जीवनास माझ्या अर्थ आला,
आईचा महिमा हा प्रत्यक्ष कळाला...
माझ्या रुसव्याफुगव्याची हक्काची जागा तु,
जीवनाचे धडे देणारी माझा आदर्श तू...
माझ्या स्वप्नांना पाठबळ देणारी तूच,
माझ्या आयुष्याचा दोर आई तूच ग...
तुझ्या विश्वासाच्या कवचात आहे मी सुरक्षित,
तु असता सोबती नाही जगाला ग मी भीत...
जेथे चुकीला माफी नाही पण
दुरुस्तीला प्रोत्साहन आहे,
तुझ्या आगळ्या वेगळ्या प्रेमाचाच
तो परिणाम आहे...
नाही फेडू शकत पांग तुझ्या ऋणाचे,
प्रयत्न करेन तुझे स्वप्न पूर्ण करण्याचे...
