STORYMIRROR

Tejaswita Khidake

Others

4  

Tejaswita Khidake

Others

नौवारी

नौवारी

1 min
125

नको ती जिन्स मला अन् नको ती पँन्ट शर्ट,

मला नौवारीच नेसाविशी वाटतेय.


नको ते पाश्चात्यीकरण मला अन् नको ती फैशन,

मला भारतीय संस्कृतिच आपलीशी वाटतेय.


नको तो सुट मला अन् नको तो बरमुडा,

मला धोतर पायजमाच फैशनेबल वाटतोय.


नको ती कैप मला अन् नको ती हैट,

मला टोपी अन् फेटाच लयी भारी वाटतोय.


नको ते लिनन मला नको ते पाँलीस्टर,

मला सुती, अन् खादीच हवीहवीशी वाटतेय.


नको तो रिबोक चा बुट मला नको ती कैटवाँक ची चप्पल,

मला कोल्हापुरी च लयी झाक वाटतेय.


नको ती लक्स मला अन् नको ती मोती,

मला उटणंच तुलनेत औषधि वाटतय.


नको ती फेअर ऐण्ड लवली, नको ती गारनीयर क्रिम,

मला हळद अन् मुलतानी मातीच गुणकारी वाटतेय.


नको ती रिवायटल अन् नको ते बोर्नविटा,

मला च्यवनप्राशच बलवर्धक वाटतय.


नको तो बर्गर अन् नको तो पिज्जा,

मला वरण भात भाजी पोळीच आरोग्यदायी वाटतय.


नको ती जिन्स मला अन् नको ती पँन्ट शर्ट,

मला नौवारीच नेसाविशी वाटतेय.


Rate this content
Log in