मृदगंध पावसाचा
मृदगंध पावसाचा
1 min
163
आल्या पावसाच्या सरी
चिंब मातीला त्या करी
सुखावली धरणी माता
पशु- पक्षी, नर - नारी
झाले हिरवे गार आता
कोरडे ते शुष्क रान
कृषक निघाले शेतात
घेऊन नांगर, तिफण
नभी गडगडाट नाद
सौदामिनी ती गर्जत
चाहुल लागता मेघाची
मोर नाचे तो बनात
तप्त भुई शांत झाली
जरा विसाव्यास आली
अंकुर मातीतून फुटे
उब बीजाला मिळाली
बरसल्या धो-धो सरी
नवी पालवी सृष्टीत
गुरे जाती चरायासी
रानोमाळी शिवारात
आली ती वर्षारानी
जशी माहेरवाशीण
धरा तोषली मनात
शालू हिरवा नेसून
