STORYMIRROR

Shital Uttarwar

Others

3  

Shital Uttarwar

Others

सुखद  पाऊस

सुखद  पाऊस

1 min
157

शुभ्र बर्फाळ ह्या 

पावसांच्या सरी 

मोहरले रोम, रोम

बहरली प्रीत न्यारी

 

 पापणीत साचले 

 अंतरंगी डोलले 

 सख्यासवे माझिया मी

 चिंब, चिंब धुंद न्हाले

 

ओला सुगंध वारा 

अंगावरी शहारा 

ओल्या मिठीत येता

 हा रेशमी निवारा 


 न्यारीच आज गोडी 

 झाले मी त्यात वेडी 

 मन हे अधीर झाले 

 सर्व बंध सोडी

  

काळोख दाट झाला

काळोख गंधाळला 

मंत्रमुदध पावसाने  

नशा आली रात्रीला


तुझ्या नि माझ्या प्रितीचे

सुखद पावसाचे तराणे

धुंद, नशीली रात्र होती

प्रणयात चिंब भिजून जाणे


हिरव्या गर्द गंधाळ रानी 

भन्नाट वारा शीळ घाली 

पावसांत न्हाली धरा 

नवा साज प्रीत ल्याली


साहित्याला गुण द्या
लॉग इन