मन ही बावरे...
मन ही बावरे...


भारावलेल्या डोळ्यांचे दुःख जाणले ....
गुपचूप चेहऱ्याचे भाव जाणले ....
पण स्वतःची केविलवाणी कहाणी नाही ऐकवली ....
सुखाचे मनोहर गीत त्याने गाइले ....
कोसळत्या पावसात अश्रू वाहिले ....
पण सूर्याच्या तेजाने जणू सारे सावरले ....
परक्यांचे दुःख स्वतःचे झाले ....
स्वतः आनंदाला दुरावले ...
थंडगार वारा बनून दामलेल्यांना निजवले ....
पण स्वतः चे ढगांशी भांडण नाही सांगितले ....
परोपकाराच्या नदीत माशांचा उद्धार केला ....
पण कोण जाणे किती दगडांचा मार खाल्ला ....
तरू-रूपांत , भटकणाऱ्यांना सावली दिली ...
पण त्याला मिळणारा भास्कराच्या कोप कुणी नाही बघितला ....
इंद्रधनुष्याचे दर्शन जणू त्याने करून दिले ....
पण त्यांच्या नशीबात जणू रंगांनी नाही यायचे ठरविले...
लोकहितासाठी समुद्रातून मोठी लाट बनून आले...
पण तटाशी येऊन धरणीचे झाले...
कुणास ठाऊक त्यागासाठी...
का त्याचे मन ही बावरे...