मले बी शाळेत जायचं हाय वो बाबा
मले बी शाळेत जायचं हाय वो बाबा
अंगात निळा पांढरा झगा घालूनी
पाठीवर दप्तरात पाटी पुस्तक घेऊनी
मले बी शाळेत जायचं हाय वो बाबा
अभ्यास बी करीन अन् घरकाम बी करीन
तुमाले शेतात मदत बी करीन
आता तरी शाळेला धाडा वो बाबा
मले बी शाळेत जायचं हाय वो बाबा
दादाच्या संग शाळेत जाऊन
आकड्यांचं गणित शिकायचं वो बाबा
मले बी शाळेत जायचं वो बाबा
लय लय शिकून, साईबिन होईन
म्या तुमच्या कष्टाचं चीज करीन बगा
मले बी शाळेत जायचं हाय वो बाबा
एकदा इश्वास टाकून तर बगा
नाव तुमचं कमावून दावीन बगा
मले बी शाळेत जायचं हाय वो बाबा
गावातल्या पोरी माया आदर्श घेईन
लय लय शिकून त्या बी मोठ्या होईन
सुरवात तुमी करून तर बगा
मले बी शाळेत जायचं हाय वो बाबा
दादा जातो शाळेत, म्या काउन नाय
फकस्त पोरगी हाय म्या म्हणून शिकायचं नाय?
असा नियम सांगा, कुणी बनवला वो बाबा
मले बी शाळेत जायचं हाय वो बाबा
आता तरी इचार करा वो बाबा
मले बी शाळेत जायचं हाय वो बाबा
