कलावंतीण आयुष्याची
कलावंतीण आयुष्याची
1 min
307
हातात तुझ्या जादू ही न्यारी
वर्णू किती कौतुक तुझे गं नारी
हाताला तुझ्या चव अशी की
मन सार्यांचे तू तृप्त करी
दारात रेखिते सुंदर रांगोळी
बघून पसरते प्रसन्न लहरी
विणकाम असो वा शिवणकाम
कलेची जादू तुझ्या हातात भारी
रंगरंगोटी, कलाकुसर करतेस सुरेख
जन्मताच आहे तुझ्यात कलेची शिदोरी
लागताच हात तुझ्या कलेचा
निर्जीव वस्तूही भासे लय भारी
कलावंतीण तू आयुष्याची
तुझ्याविना रंगहीन दुनिया सारी
घर सजवितेस कल्पकतेने
बघता दरवळे आनंद अंतरी
कलेची तू राणी, कल्पकतेची देवी
अशीच कला तुझ्यात असो जन्मो जन्मांतरी
वर्णू किती महिमा तुझ्या कलेचा
तू या सृष्टीची आहेस राणी
