मला माणसं वाचायची होती.
मला माणसं वाचायची होती.
मला माणसं वाचायची होती काही लहान, काही मोठी काही खरी, काही खोटी मला ना एकदा माणसं वाचायची होती काही प्रेमळ, काही दुष्ट काही मायाळू, काही द्वेष करणारी मला माणसं वाचायची होती काही दयावान, काही हैवान
काही थोर, काही महान मला फक्त एकदा माणसं वाचायची होती त्यांच्यातली माणुसकी वेचायची होती, मनाला कोर कोरं ठेवून नव्या कोऱ्या वही सारखं
त्यावर स्वप्नांची रंगीत गोंदण करायची होती मला फक्त एकदा माणसं वाचायची होती
माणूसपणाची ओलसर किनार गर्भात शोधायची होती आयुष्यात फक्त एकदा मला ना माणसं वाचायची होती.
