मला कधी जमलेच नाही....
मला कधी जमलेच नाही....
तुला मनातल सांगण मला कधी जमलच नाही ..
गोष्टी ओठांवर येता येता
त्या तुज्वर येऊ देण कधी जमलच नाही ....
तुला विसरता येणं शक्कय होईल कदाचित....
पण तू सोबत नसण्याची खंत मात्र जन्मभर पाठ पुरवा करत राहील....
तुला सांगता आल असत तर...
बरच कही सोप झाल असत...
पण तू समोर आलास की...
साध बोलण सुद्धा कठीण असत....
नजरेत न माझ्या तुला
कस कही कळत नाही....
का कळत सगळ...पण
तुला ते वळत नाही....
आनंदी होऊ यासाठी की....
तू माझा मित्र आहेस....
का खंत करू याची
की जन्मभर फक्त मित्रच राहणार आहेस....
तुझे प्रत्येक दुख्ख का मज
हवेहवेसे वाटते....
त्यापुढे माझे सगळे सुख मग
का कवडिमोल वाटते....
तू नसताना नजरेत
जिव का कसविस होते....
पण तू समोर असताना मात्र
हीच नजर उचलण देखील
कठिण होते....
तुला माझी व्यथा कधी कळणार...
पण कळुनही आपले अयुष्य मग
कोणते वळन घेणार....
तूच म्हणाला समोरचा विचार करुन जर आताच रडू येत असणार तर तो विचार करुन काहीच अर्थ नही उरणार....
पण कस सांगू तुला की फक्त तू विचार केलास तर सगळ आयुष्य माझ फुलणार ....
खपली धरलीय जखमेवर....
तसेच काहीसे तुझ्या बबतितही होईल कदाचित....
पण ती जखम अठवली तर...
वेदना मात्र मलाच होईल...
खुपदा विचार केला की तुझ्या बद्दलच्या भावना मनातन पुसून टाकेन ....
पण मनाला मात्र ते कधी जमलच नाही....
तू स्वतः हुन ओळखाव अस वाटल बरेचदा...
पण तुला ते कधी कळलेच नाही....
का जिव लावला तुझ्यावर
याची आता खंत आहे...
कारण तुझ्यासारख जिव कहाडून घेण ..मला कधी जमलच नाही....
दुसरं कुणी आल जीवनात म्हणून तुझ्यासारख विसरून जाणं मला कधी जमलच नही....
तुझ्यासाठी सगळच सोप आहे कदाचित...
माझ्यासाठी मात्र सगळ सोपहि कठिण होवून बसलय....
कारण....
तुझ्यातन बाहेर निघण.....
माला कधी जमलच नाही.......
