मज प्रेमाची मुभा नाही!
मज प्रेमाची मुभा नाही!


बांधावरच्या गवताने, एकदा पाण्यास विचारले,
झुरले होते बिचारे, पाण्यासवे गहिवरले,
किती दिस घेतो, येता येता रे तू,
कासाविस झाले अंग, घे रे मिठीत तू,
सजले कधीचे, तुजला का दिसत नाही,
मज वेडीचे, प्रेम का तुजला रुचत नाही,
असतील कैक प्रेमवेडे तुझे,
परी माझ्या प्रेमाची न सर कोणाला,
सोडून एकटीच, जातो कोणाच्या रे भेटीला,
कितपत राहू अशीच, सांगू कोणाला दुःख माझे,
तुजविण नाही सख्या रे आधार जीवाला,
रडणे झाले शोकांतिका, मज रडण्याची मुभा नाही,
कितपत रडावे, कितपत झुरावे मज प्रेमाची मुभा नाही...