STORYMIRROR

Neelam Kulkarni

Others

4  

Neelam Kulkarni

Others

मी म्हणते आरसा...

मी म्हणते आरसा...

2 mins
23.5K

खिडकीतून बाहेर डोकावत होते मी एक दुपारी 

पण मग दुपार सायंकाळ आणि रात्र सरली तरी बाहेरच चित्र मात्र बदललं नाही 


माणसं दिसत नव्हती म्हणून झाडा फुलांकडे लक्ष गेलं

बघता बघता मन एका वेगळ्याच विश्वात रमत गेलं

 

नेहमी शांतता शोधणारी मी आज बाहेरच्या स्तब्धतेला नवीन होते 

सतत आवाजाची आणि गर्दीची इतकी सवय होती पण मी हे एक वेगळच आयुष्य बघत होते 


गेल्या आठवड्यापर्यंत सगळं कसं आखलेलं होतं 

जगण्याच्या आराखड्याखाली जीवन वाकलेलं होतं 


तेव्हा हलकेच दबलेल्या पावलांनी नकळत आयुष्यात आला हा कोरोना

जग याला वायरस म्हणतं मी म्हणते आरसा 


पन्नाशीसाठी पर्यंतची तयारी आता व्यर्थ वाटू लागली

प्रत्येक क्षणाचे मोल आता भलतेच वाटू लागले


सुखसोई आता रिकाम्या वाटू लागल्या 

जेव्हा घरातील वस्तूंनीच पूर्ण आठवडा भागला


शोधू लागले मन कधी न केलेल्या गोष्टी

बघत होते जुने फोटो आणि बदललेले मी 


वेळ नाही वेळ नाही असं म्हणून राहिलेले छंद

परवापर्यंत सगळं मागे टाकून जगण्याची होती एक वेगळीच धुंद 


वाटलं नव्हतं आत्मचिंतन करायची अशी वेळही कधी येईल

आणि प्रत्येक क्षणातून माणूस आपली झोळी भरून घेईल


हरवलेल्या गोष्टींना पुन्हा घेऊन आला हा कोरोना

जग याला वायरस म्हणतं मी म्हणते आरसा 


तो म्हणाला थांब जरा इतकी घाई कशाला

खरं जगणं काय आहे मी शिकवतो तुला


आपल्या माणसांसोबत रहा जरा बाहेरचे नाही येणार वेळेस

तोंडात पाणी तेच देतील शेवटच्या मग श्वासात


तो म्हणाला पर्यावरणाची चिंता तरी कधी कर

रोज दुचाकी चारचाकी कधी शतपावली तरी करून बघ


आपली कामे आपणच करावी अस तो म्हणत होता

प्रत्येक कामात वेगळाच आनंद करताना मला वाटत होता


हरवलेल्या मैत्रिणींना मी ऑनलाइन शोधून काढलं

तेव्हा जुन्या आठवणींच्या पावसाने येऊन माझं घर धाडलं


वेळ कधीही तोकडी नसते अस सांगून गेला कोरोना

जग याला वायरस म्हणतं मी म्हणते आरसा 


गेलेले प्राण आणि राहिलेली इच्छा रोज दिसते

निरोपही न घेता येणं हे बघूनच काळीज बसते


आई वडील भाऊ बहिणी सगळे एकदमच आठवतात मग 

वाटतं कोणाच्याही आयुष्यात नको हे काळे ढग 


आत्ताच बोला आत्ताच सांगा आत्ताच भावना होऊ द्या व्यक्त

वेळ वेगळी आहे समजा कधीही करेल विभक्त 


व्यक्त न होता जाणे यापेक्षा मोठे दुःख नाही 

वेळ वेगळी आहे समजा कधीही दगा देऊन जाईल


मी कोण आहे मला हवं तरी काय या आयुष्याकडून

पूर्ण बळाने हलवून विचारा अंतःकरणाला खडसावून


कारण तो सांगतो बघ मी कधीही येऊ शकतो मी कोरोना

जग याला वायरस म्हणतं मी म्हणते आरसा 


Rate this content
Log in