कल्पनेतील परी...
कल्पनेतील परी...
समोरील खुर्ची बेसावध हलत होती
कादंबरीतील कथा जणू डोळ्यात उतरत होती
पानामागून पाने भरभर पालटुन झाली
तेव्हा कल्पनेतील एक परी डोळ्यासमोर आली
आखिव चेहरा आणि सुसंस्कृत डोळे
शिस्त साधेपणा आपणहून बोले
सरळ वागणं आणि सरळ बोलणं चाले
उद्धट उदगार कधी कानावर नाही आले
मैत्रिणींसोबत बिनधास्त फिरणं सुरू होतं
नवे नवे अनुभव स्पर्श करून जात होते
समोरून एक सावली आली होती तेव्हा कधी
वाटलं होतं आतातरी हळद लागेल बरी
तरुण असा तो ऋतू होऊन गेला
तेव्हा सनई-चौघडे मात्र रुसून गेले
अश्रू टिपणे सतत सुरू होते
पण होकार सगळे आता हरवून गेले
प्रेम कथेतील एक काल्पनिक बाब होऊन बसली
समोरून प्रेम चालत येईल तीही अपेक्षा आता थकली
कल्पनेतील परी पुढे चालतच राहिली
भूतकाळाकडे मात्र आता तिने पाठ केली
लग्न न होता मग ती गृहिणी झाली
आणि जन्म न देता मग ती आई झाली
बहिण भावाच्या भातुकलीतील
ती एक महत्त्वाची भूमिका झाली
खेळत होते तिच्या भोवताली चार-पाच नाचरे बाळ
जन्म न देता जाणवत राहिली संबंधांची ती अदृश्य नाळ
पोरांसाठी परी जीव टाकत जाई
आणि पोरांना जळू दिसत राहिली एक वेगळीच आई
भातुकलीचा खेळ आता वेगळ्या वळणावर आला
पाखरे गेली आहेत उडून आणि वृद्धापकाळ आला
तरुण तरी त्या आठवणी आहेत अजून
गर्द थंडीत अजूनही होऊन येतात त्या उबदार ऊन
काय मिळालं आणि काय नाही जीवनात
याची वजाबाकी नगण्य आहे
बेभान धुंद जीवन जगायचं असतं छान
परवा काळजी कधी आणू नये प्रवासात
हे माझं की ते आहे माझं यात कसला आनंद
मला यातून मिळणार तरी काय याचा मुळीच नसे छंद
ओंजळीतील सुख दुसऱ्याला सढळ हाताने देई
अशा निस्वार्थतेने तिचे मन तृप्त होई
नातं नसलं तरी आपलं कसं करून घ्यावं
मायेने प्रेमाने आपण कसं बेभान भाव
देण्याचा आनंद वेगळाच आहे काहीतरी आहे वेगळीच मजा
आपण नुसतं देत जायचं तीच या आयुष्याची सुश्रुषा
आयुष्याचे कोडे जेव्हा मला अवघड वाटू लागले
परदेशाहून मग मी लागलीच माझे घर धाडले
चिंता काळजी कोडे आणि मग भीती ही नाहीशी झाली
कल्पनेतील एक परी जेव्हा डोळ्यासमोर आली!!
