STORYMIRROR

Neelam Kulkarni

Others

4  

Neelam Kulkarni

Others

आई पुन्हा जन्म घेते

आई पुन्हा जन्म घेते

2 mins
146

इवलासा जीव शरीरातील बदलांना देत असतो वाव

कधी आनंदी कधी अधीर असा क्षणात बदलणारा स्वभाव

तिलाच कळेना कसले हे डोहाळे लागती

ती जरी निजत असे तरी ते खोडकर डोळे जागती


दिवसांमागून दिवस सरतात आणि वाट बघणे सुरू होते

कसं करावं काय करावं याचा आढावा ती सतत घेते

चालता चालता तिचे शरीर आता तीला पेलवत नसते

धीर धरून तरी ती पुन्हा एकदा निवांत हसते


ही वेळ सरेल नाहीशा होतील या ही वेदना

नवीनच तो उल्हास असेल असेल नवीनच ती चेतना

या बदलांच्या पलीकडचं जग तिला बोलावत असते

नवीन जीव आपल्यातून येणार याहून मोठी अनुभूती नसते


एरवी शरीर जपणारी मापक दिसणारी

घरभर पायाची भिंगरी करून बिनधास्त फिरणारी

आतील जिवाच्या विचारांमध्ये स्वतःला झोकून देते

त्या गोंडस नाजूक जीवाला जन्म देऊन खरतर आई पुन्हा जन्म घेते


रात्रीचा मग दिवस होतो भविष्य घडविण्यात ती गुंग होते

रिकाम्या पानांवर ती एकेक अक्षर लिहित जाते

हातातील ते नाजूक बोट शाळेच्या पहिल्या दिवशी जेव्हा पहिल्यांदाच सुटते

आपल्या शरीराचे एक अवयव आपण शाळेत सोडून आलो असे तिला वाटते


तिला काय हवं तिला काय आवडतं हे प्रश्न स्वतःला ती आता विचारत नसे

शाळा शिकवण्या सहली यात भलतीच गंमत तिला वाटत होती

पिल्लाच्या यशामध्ये ती आपलं यश बघत होती

निकालाच्या यशाची लाली तिच्या चेहऱ्यावर चमकत होती


शरीर दमत होतं पण मन काही थांबत नव्हते

स्वप्नांनामागून स्वप्नांना नवीन पंख फुटत होते  

हिचे पिल्लू भलतेच हुशार असे पटकन जेव्हा एखादी मैत्रीण म्हणते

तेव्हा उल्हासित होऊन खरंतर आई पुन्हा जन्म घेते


बालपण सरते आणि समोर मोठे जग दिसते

पदरा खालचं पिल्लू आता आकाशात उंच उडत असते

ती आता काळजी या विश्वात जगत असते

उरलेल्या आयुष्याच्या उत्तरार्धाकडे ती वाटचाल करत असते


लाडाने वाढवलेलं पिल्लू मग ती नांदायला दुसरीकडे पाठवते

नव घर नव जग त्याला देऊनही ती त्याचीच काळजी करते

पिल्लू आता हळूहळू बदलत असते

नवीन जग आता ते ओळखत असते


निस्वार्थी प्रेम पिल्लू बाहेर शोधत असते

पण आईच्या मायेची सर कशातच येत नसते

आपल्यातून आलेल्या जीवाला मग आई नजरेसमोर घेते

आणि अशाच एखाद्या दुपारी आई निरोप घेते


ठेचा होऊनही मन आता पुन्हा जगायला शिकते

आईचं ते प्रेम मात्र अंतःकरणातून सतत हाक देते

जबाबदाऱ्यांचं ओझं वाहता वाहता आता मीच माझी आई होते

आणि मग बदललेल्या माझ्यातूनच आई पुन्हा जन्म घेते 


Rate this content
Log in