मी एक स्त्री
मी एक स्त्री

1 min

166
रोज एकदा तरी मज सांगते कोणी
थांब जरा ऐक जरा "तू एक स्त्री "
केले संगोपन जशी परिकथेची राणी
बघ आता मोठी झाली "तू एक स्त्री "
आयुष्य हे वेचून घे, जशी पाल्यातली कळी
फुलशील कशी जाणिवेने "तू एक स्त्री "
रंगवण्या हात तुझे, कोणी शेतात राबतो
कोणी चाकरी करितो, कारण "तू एक स्त्री"
कधी काळीज फाटते, अश्रू मी पण ढाळते
सांगते स्वतःला आहे " मी ही एक स्त्री "