मदत
मदत

1 min

23.6K
घरात बसुन होतो म्हणुन करू लागलो बायकोला हातभार
कधी कधी वाटते कोरोनाचेच नाहीत ना हे उपकार
कारण कधी लावला नव्हता साधा तांब्याला पण हात
आता दररोज देतो बायकोला मदत स्वयंपाकघरात
लाॅकडाऊन मध्ये कोरोनाने एक मात्र चांगले केले
बायकोच्या कष्टाचे चित्रण समक्ष डोळ्यांनी पाहिले
आम्हा दोघांचे प्रेमात यामुळे झाली मोठी वाढ
घरातच बसून पुरवतोय आम्ही एकमेकांचे लाड
तरीसुद्धा कोरोना संपवायचा एकच आहे काम
सारे कोरोना वाॅरीयर्सना द्यायचा आहे आराम