मायमाती
मायमाती
1 min
26.2K
काजळावाणी काळ्याभोर
जमिनीत
नांदली पिकं
कुस उजवली
कित्येकदा
मातीची....
खंडीभर राशी
पडल्या खळ्यावर
आबादानी संसारात
फुलली सुखाची स्वप्नं.
काळीजकळ
माहितच नव्हती
तेव्हा जिवाला
पण
घराचे वासे फिरावेत
तशी बदलली त-हा
रानाची..
बदलले हंगाम
कुठल्या जन्माचा
हा भोगवठा
कळलं नाही
कुणी म्हणतं
दृषटावली मायमाती
आजकाल बाभूळवन
आहे तिथे
जिथे कधीकाळी
माझ्या पिढ्यांनी
जपली होती
माझी मायमाती
माझी रानमाती
माझी मायमाती
