माय
माय
1 min
231
नऊ मास मला|ठविले गर्भात
वाढले सुखात|तिच्यामुळे...
माय माझी खुप|असे सुगरण
भरलेलं मन|तीचे असे.....
कशी होऊ सांग|तुझी उतराई
प्राणप्रिय आई|असे माझी.....
मोठं तिचं मन|जीवनाचं धन
चरणी अर्पण|करते मी.....
ऋण माऊलीचे|नाही फिटणार
तिचे उपकार|जन्मो जन्मी...
माऊली प्रेमाला|जगी नाही तोड
गीत गाते गोड|बाळासाठी....
कसं सांग फेडू|पांग आई तुझे
ईश्वर ही पुजे|नित्य तुला....
