सृष्टीसौंदर्य
सृष्टीसौंदर्य
1 min
222
लाटा रंगांच्या
गंधीत क्षणांच्या
सोहळ्यात फुलांच्या...१
सृष्टी नटली
शालू ही नेसली
अंगोपांगी फुलली.....२
गंध माळले
डोंगर सजले
सप्तरंगी शोभले.....३
निसर्ग धन
मुक्त उधळण
धुंदावले हे क्षण......४
निसर्ग प्रीत
झरा खळाळीत
रानफुलांचे गीत......५
